श्याम फागुन उत्सवाचे भव्य शुभारंभ
उत्सवात श्यामबाबाचा मुख्य फागुण उत्सव उद्या सोमवार दि १० मार्च रोजी होणार आहे. आज सकाळी ८ वाजता श्री राणीसती मंदिर येथून परंपरागत खाटू नरेशची भव्य निशाण यात्रा आकर्षक रथ व मनमोहक झाँकी समवेत निघणार आहे. यात जुने शहर, डाबकी रोड येथील निशाण यात्रा मनमोहक झाँकी सोबत राहणार आहे. ही संयुक्त यात्रा सिटी कोतवाली परिसरातून एकत्र पणे रामदेवबाबा श्यामबाबा मंदिरात पोहोचून महाआरती व प्रसाद वितरण होणार आहे. या दिनी कलकत्ताच्या फुलानी बाबा श्यामचा अनुपम व अलौकिक श्रुगांर करण्यात येणार आहे. साय ७वाजता इंदोरच्या प्रसिद्ध भजनकार गौरी अग्रवाल यांची भजन संध्या होणार आहे. यात साथसंगत राम देशपांडे यांची संगीत टीम करेल. या सोहळ्यात फुल व अत्तर ची होळी भक्तगण खेळून जल्लोष करणार आहेत. उत्सवात मंदिर परिसरात दि १५ मार्च पर्यंत भव्य फागुण महोत्सव सुरू असून त्यात विविध प्रकारचे झोपाळे, विविध व्यंजन स्टॉल्स, विविध खेळ खेळणे उपलब्ध करण्यात आले आहेत.
या श्यामबाबाच्या फागुण उत्सवात सर्व भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रामदेवबाबा श्यामबाबा सेवा समिती, श्याम श्रृंगार समिती, श्याम चे दिवाने, विप्र युवा वाहिनी, ओल्ड सिटी श्यामबाबा परिवार, जय बाबारी ग्रुप, लख दातार गृप आदीनी केला.