महाबोधी विहार बुद्धगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या सबहेड – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
AB7, ज्ञानेश्वर निखाडे
महाबोधी विहार बुद्धगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या
सबहेड – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अकोला – बौद्ध गया येथील महाबोधी विहार, बुद्धगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
अकोला जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) तर्फे पु. भन्ते आनंद महाथेरो यांनी बौद्ध गया येथील महाविहार बाम्हणांच्या ताब्यातून मुक्त करण्याकरिता आंदोलन सुरु केलेले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अकोला जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष प्रा. राहुल इंगळे, जिल्हा महासचिव विजयकुमार चक्रे, महानगर अध्यक्ष साहेबराव इंगळे (गुरुजी), जिल्हा महिला अध्यक्ष सौ. लक्ष्मीबाई डोंगरे, जिल्हा सचिव संदीप सावंग, महानगर उपाध्यक्ष देवानंद अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत भगत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रत्नदीप खरात, विधी सल्लागार ॲड. प्रमोद रौंराळे, युवा आघाडीचे ऋषभ इंगळे, नाना शेगोकार, ज्येष्ठ आघाडीचे गोवर्धन अभ्यंकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
————————————————————————————–