गळफास घेऊन आत्महत्या केली.
गळफास घेऊन आत्महत्या केली.
अकोला आई-वडिलांचे एक स्वप्न असते की आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन यश प्राप्त करावे आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता कोणी इंजिनियर. तर कोणी डॉक्टर. आर्किटेक. इतर क्षेत्रात ऍडमिशन घेतात मुलांना आपल्या गावात किंवा आपल्या जिल्ह्यात जसे पाहिजे तसे शिक्षण मिळत नसल्यामुळे काही मुले इतर जिल्ह्यात शिक्षणासाठी जात असतात शहरात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांने तोष्णीवाल ले-आऊटपरिसरातील जलाराम अपाटमें टमधील एका भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास घडली. प्रसन्न वानखडे (वय १७, मूळ रा. बेळगाव, ता. मेहकर, जि. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तो नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी अकोला शहरात खोली करुन समवयस्क मुलांसोबत राहत होता. त्याचे मित्र बाहेर पडल्यावर शुक्रवारी रात्री आठनंतर या
मुलाने खोलीत एकटा असताना गळफास घेऊन आत्महत्या केली, असे सिव्हिल लाइन पोलिसांनी सांगितले. तो तोष्णीवाल ले- आऊट परिसरातील एका नामांकित कोचिंग क्लासचा विद्यार्थी होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अभ्यासाच्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे, पोलिसांचा अंदाज आहे. ज्यावेळी प्रसन्न वानखडे हा आत्महत्या कर्त्यावेळी सदर रूम पार्टनर कुठे गेले होते असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झालेला नव्हता. पोलिस तपास करत आहेत.