अल्पवयीन मुलीवर अत्याचार
रिसोड, सध्याच्या परिस्थितीत महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच आहेत. नुकतेच पुणे येथील स्वारगेट येथे शिवशाही बस मध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाची शाई वळत नाही तेच रिसोड मध्ये एका अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान घडली. सदर प्रकरणी पीडिता आपल्या परिवारासह रिसोड बोलीस स्टेशन मध्ये संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान पोहचली. मात्र रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल केली नव्हती तर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यामुळे रिसोड पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. पोलिसांच्या या कार्यशैलीमुळे पोलिसांना घटनेचे गांभीर्य समजत नसल्याचे दिसते. तुझ्या मामाने तुला बोलावले असे सांगून एका व्यक्तीने शहरातील एका शाळकरी विद्यार्थिनीला आटोत बसवून रिसोड वाशिम मार्गावर एका निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना २७फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोनवाजताच्या दरम्यान घडली. लैंगिक अत्याचार करून सदर मुलीला त्याच ठिकाणी सोडून सदर व्यक्ति तिथून पसार झाला. घटनेची हकीकत ही पिडीतेने आपल्या आई-वडिलांना सांगितली. वडिलांसह सदर पीडीता रिसोड पोलीस स्टेशनला येऊन घटनेची सविस्तर माहिती ‘रिसोड पोलिसांना दिली. याबाबत माहिती अशी की रिसोड शहरातील एका शाळेत अकराव्या वर्गात शिकणारी मुलगी रिसोड शहरातील एका संगणक शिकवणी वर्गात शिकवणी करिता गेली असता शिकवणी झाल्यानंतर एक अज्ञात व्यक्ति आला व त्याने सांगितले की तुला तुझ्या मामाने बोलवले व मला सोडवीन्यास सांगितले. त्याने आपला फोन काढून मामाला बोलत असल्यांची बतावणी केली व एका ऑटोमध्ये बसवून वाशिम मार्गावर सवड शेत शिवारात एका निर्जन स्थळी नेऊन तिला चाकूचा धाक दाखवला व तिच्यावर लैंगीक अत्याचार केले. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी पीडीतेचे बयान घेणे सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.