तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी वृद्ध महिलेला गंडविले ■ ७५ हजार रुपयांचे दागिने पळविले ■ राधास्वामी सत्संग भवन येथील घटना ■ पोलिसांनी केला आरोपींविरूध्द गुन्हा दाखल
AB7
तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी वृद्ध महिलेला गंडविले
■ ७५ हजार रुपयांचे दागिने पळविले
■ राधास्वामी सत्संग भवन येथील घटना
■ पोलिसांनी केला आरोपींविरूध्द गुन्हा दाखल
अकोला: जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ जवळील राधास्वामी सत्संग भवन येथील परिसरात एका ६० वर्षीय वृध्देला दोन • तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी गंडविल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली. पोलिस असल्याची बतावणी करून त्या दोन तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी वृध्द महिलेकडील सुमारे ७५ ते ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागदागिने पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन भामट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती. ज्योती श्रीचंद रायसिंग (६०) रा. सिंधी कॅम्प, नानक नगर ही वृध्द महिला तिच्या पतीसह राधास्वामी सत्संगासाठी बाळापूर रोडवरील परिसरात गेल्या होत्या. सत्संगावरून परत येत असताना
दोन तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे वाहन थांबवून स्वतःला पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून ओळख दिली. त्या दोन तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी सदर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. आम्ही पोलिस आहोत. तुम्ही सोन्याचे दागिने घालून फिरत आहात. तुमचे सोन्याचे दागदागिने काढून एका रूमालमध्ये त्यांना दिले आणि तेथून पोबारा केला. दोघेही घरी गेल्यानंतर ज्योती रायसिंग यांनी दागिने ठेवलेला रुमाल उघडला असता, त्यात सोन्याचे दागिने नसून स्टीलचे कंगन आढळले. या फसवणुकीमुळे त्यांचे अंदाजे २५ ग्रॅम वजनाचे सुमारे ७५ ते ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कंगन तोतया पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून पळविले आहेत. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन भामट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जुने शहर पोलिस करीत आहेत.
*अकोला जॉब*
👇👇👇👇👇
*पाहिजेत*
शहरातील नामांकित बिछायत केंद्राचे व टेन्ट हाऊसचे विक्रेता करिता
*1) सेल्समन माणसे :-10*
*2) हेल्पर माणसे – 10 जागा*
👇👇👇👇
500/ Rs रोज पेमेंट।
संपर्क :
*अंकुश टेंट मॉल* बाळापुर नाक्या च्या मागे बायपास, खामगाव रोड, अकोला मो. *7721055555*
भेटण्याची व फोन करण्याची वेळ दुपारी 2 ते रात्री 10
◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*अकोला शहर में जॉब की जानकारी के लिए व्हाट्सएप ग्रुप ज्वा,इन करें*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆