पुण्यातील रेप केस प्रकरणातील आरोपी अटक स्वारगेट बसस्थानकावर
पुण्यातील स्वारगेट बस स्थान परिसरातील शिवशाहीच्या बस मध्ये महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी बलात्काराचा आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (३७) याला पुण्यातील शिरूर येथून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काल रात्री त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी जेवण्यासाठी गेला होता. त्याच व्यक्तीने आरोपीच्या आगमनाची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गुरुवारी रात्री दीड वाजता आरोपीला अटक केली