ताज्या घडामोडी

अकोला-महान महामार्ग होणार ‘फोर लेन’शीघ्रगतीचा मार्ग करण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा निर्णय।॥ केंद्रीय मंत्री गडकरी यांचे मानले खा. अनुप धोत्रे यांनी आभार  

अकोला : अकोला ते महान हा रस्ता ‘फोरलेन’ म्हणजे चौपदरीकरण आणि दहा मीटरचा चांगला रस्ता करण्याचा निर्णय देशाचे दळणवळण व रस्ते विकास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला. त्या अनुषंगाने बार्शिटाकळी, अकोला, बाळापूर तालुका तसेच कारंजा, वाशिम जिल्ह्यात जाणाऱ्या तसेच समृद्धी मार्गासाठी शीघ्रगतीचा मार्ग निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल खासदार अनुप धोत्रे यांनी आपल्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या विकासाला चालना दिल्याची प्रतिक्रिया देऊन गडकरी यांचे अकोलालोकसभा मतदारसंघाच्या वतीने खासदार धोत्रे यांनी आभार मानले आहे.खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला तें कान्हेरी हा रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी केली. त्याची दखल घेऊन कौलखेड ते कान्हेरी सरप हा रस्ता चौपदरीकरण तसेच कान्हेरी सरप हा रस्ता दहा मीटरचा करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागामध्ये वनीकरण तसेच महान ते अकोला जलवाहिनीमुळे हा रस्ता चौपदरीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे दहा मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय नॅशनल हायवे विभागाने घेतला असून, यासाठी भरघोस निधी देण्याचे अभिवचनखासदार अनुप धोत्रे यांनी अकोला ते कान्हेरी हा रस्ता चौपदरीकरण करण्याची >> मागणी केली. त्याची दखल घेऊन कौलखेड ते कान्हेरी सरप हा रस्ता चौपदरीकरण तसेच कान्हेरी सरप हा रस्ता दहा मीटरचा करण्याचा निर्णय घेतला आहे.२०० गावांसह इतर राज्याला जोडणारा मार्गअकोल्यावरून समृद्धी मार्गाकडे जाण्यासाठी तसेच बार्शिटाकळी-अकोला हा मार्ग शेतकरी आणि जवळपास २०० गावांसह इतर राज्याला जोडणारा हा रस्ता वाशिम-अकोला जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता विकासाला गती देणारा असून, नितीन गडकरी यांनी अनेक दिवसांची व माजी खासदार संजय धोत्रे यांची मागणी लक्षात घेऊन त्यांना दिलेला शब्द पूर्ण करत असल्याबद्दल खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.