आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ – तपस्सू मानकीकर अकोला – आरोग्य मित्र कर्मचारी हे एमडी
AB7
आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ – तपस्सू मानकीक
अकोला – आरोग्य मित्र कर्मचारी हे एमडी इंडिया हेल्थ इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत अकोल्यातील विविध हॉस्पिटलमध्ये कंपनी मार्फत आपली सेवा देत आहेत त्यांनी दि. 18 फेब्रुवारी 25 रोजी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेमार्फत राज्यभर संप पुकारला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या विविध प्रमुख मागण्या आरोग्यमित्रांना दरमहा 26000 हजार किमान वेतन अलाउन्स भत्ता महागाई भत्ता दरवर्षी दहा टक्के वेतन वाढ एस एल सी एल विशेष अधिकार रजा, सणाच्या सुट्ट्या, फॉर्मल ड्रेस, पेट्रोल अलाउन्स इ एस आय सी कार्ड, 2012 ते 2021 पर्यंत अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपावर असतांना अखिल भारतीय मजदूर काँग्रेस (इंटक,) चे जिल्हाध्यक्ष तपस्सू लक्ष्मीकांत मानकीकर यांनी संपावर असणारे आरोग्य मित्र कर्मचारी त्यांच्या प्रमुख मागण्या संदर्भात चर्चा करून एमडी इंडिया हेल्थ इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांच्याशी चर्चा करून आरोग्य मित्र कर्मचारी मागण्या संदर्भात चर्चा केली. त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले आणि आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांना आश्वासित केले जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अखिल भारतीय मजदूर काँग्रेस (इंटक,) तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशाप्रकारे इंटक चे जिल्हाध्यक्ष तपस्सू लक्ष्मीकांत मानकीकर यांनी आरोग्य मित्र कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला व सामान्य जनतेला होणारा त्रास वाचविला. यावेळी आरोग्य मित्र कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.