गोंधळी समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवजयंती हर्ष उल्हास साजरी
गोंधळी समाज विकास मंडळ (महाराष्ट्र राज्य) या आपल्या सर्वांच्या संघटनेच्या वतीने बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६-०० वाजता लोकमान्य नगर जुने शहर अकोला येथील तुळजाभवानी सभागृहा समोरील प्रांगणात शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सुरुवातीला गोंधळी समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव पुंडलिकराव भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो व प्रतिमेचे विधीवत पूजन करून पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्या नंतर केंद्रीय कार्यकारिणीचे सर्वश्री मधुकर सोनारगण, अमोल गिते, राजेश बोटे, प्रभाकर पाचपोर, गोपाल मुदगल तसेच जिल्हा अध्यक्ष श्री राजेश पेंढारी व महिला जिल्हा अध्यक्ष सौ. दिपाताई किसनराव दोरकर यांच्यासह सर्वश्री गजानन दोरकर, मधुकर गंगावणे, प्रमोद पाचपोर, सचिन पाचपोर, मनिष अग्निहोत्री, अरुण पेंढारी, विनोद पेंढारी, राजेश माळगण, विक्की गिते, शंकर बोटे, गजानन डोंगरे, आणि परिसरातील नागरिकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो व प्रतिमेचे पूजन केले. यावेळी गजाननराव दोरकर यांनी संबळ, तुणतुण्यासह आपल्या भारदस्त आवाजात व आपल्या खास शैलीत अंगावर शहारे आणणारा पोवाडा गायला यावेळी त्यांना समाजातील उभरते कलाकार श्री नितीन किरण अलोट, मोहन संजय अलोट, नंदू गजानन पंचांगे, विनोद मुरलीधर पंचांगे यांनी साथ दिली. विशेष म्हणजे आजच्या दिवशी आमच्या संघटनेला एक महिना पूर्ण झाला असून आमचा हा पहिला वहिला कार्यक्रम आणि तो ही शिवजयंतीचा हा निव्वळ योगायोग नसून ही एक चांगली सुरुवात झाल्याची नांदी आहे असे कार्यकारिणीतील सर्वांनी बोलून दाखवित संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. संघटनेच्या वतीने केलेल्या विनंतीला मान देऊन आजच्या या कार्यक्रमाला समाज बंधू, भगिनी तसेच परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.