आपला जिल्हा
दि. १९ फेब्रुवारी रोजी दु. १२ वा. पासून ते दि. २० फेब्रुवारीच्या सकाळी ७ पर्यंत जड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
AB7
> कटदिनानिमित्त पायदळ वारी मार्गावर जड वाहनांस प्रतिबंध
अकोला, दि. १८ : श्री संत गजानन महाराज प्रकटदिना निमित्त शेगाव येथे जाण्यासाठी पायदळ वारीची शक्यता लक्षात घेऊन त्या मार्गावर जड वाहनांस प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला.अकोल्याहून डाबकी रस्ता- गायगाव- निमकर्दा- निंबा फाटा, तसेच पारस फाटा ते निमकर्दा या रस्त्यांवर दि. १९ फेब्रुवारी रोजी दु. १२ वा. पासून ते दि. २० फेब्रुवारीच्या सकाळी ७ पर्यंत जड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
०००