वकिलाला मारहाणीचा पाचोऱ्यात निषेध
पाचोरा : अमळनेर येथे न्यायालयातउलटतपासणी करत असताना अॅड. प्रशांत बडगुजर यांनी साक्षीदाराला विचारलेल्या प्रश्नाचा राग आल्याने संबंधित साक्षीदाराने न्यायालयाच्या आवारातच त्यांना मारहाण केली. या प्रकाराचा दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे सर्व सदस्य वकिलांनी निषेध केला आहे.या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथील सर्व वकील बांधवांनी दुपारच्या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. दुपारी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली.विविध मागण्यावकील सुरक्षेसाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या वकिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वकिलांच्या विरोधात अन्यायकारक कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करून लादले जाणार नाहीत, याची खात्री सरकारने द्यावी, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.पाचोरा न्यायालयासमोर निदर्शने करताना वकील. `