राजकीय

LadKi Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं ‘ते’ टेन्शन दूर, मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची अपडेट

लाडकी बहिण योजना योजना निवडणुकीनंतर बंद होणार अशी चर्चा सुरू आहे, मात्र आता योजनेबाबत मुख्यमंत्र्यांकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.

गरजू महिलांना मदत व्हावी या उद्देशानं लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरू केली. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. जुलैपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत असून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात अँडव्हास जमा करण्यात आले होते. या योजनेवरून सरकारवर टीकेची झोड देखील उठली, दरम्यान लाडकी बहीण ही योजना म्हणजे निवडणुकीसाठीचा जुमला असून निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार आहे, अशी टीका विरोधकांकडून सरकारवर होतं आहे. आता या टीकेला उत्तर देताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

लाडकी बहीण योजना विरोधकांना सलत आहे, कोणीही ही योजना बंद पाडू शकणार नाही. सरकारची कोणतीच योजना कधीही बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून, पैसे वाढत जाणार आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार चौकार, षटकार मारणार आहेत, विरोधकांचं सरकार येणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी देखील जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दावा केला होता. लाडकी बहीण योजना कोणीही बंद पाडू शकणार नाही. लाडक्या बहिणीचे पैसे वाढत जाणार, वाटत जाणार. आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबरचा हफ्ता मिळणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकीकडे ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार अशी चर्चा सुरू असताना आता मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.