मलकापूर येथे दिनांक 12 पासून श्रीमद भागवत कथा आयोजित.मंडपाचा भूमिपूजन समारंभ संपन्न.
AB7
मलकापूर येथे दिनांक 12 पासून श्रीमद भागवत कथा आयोजित.
मंडपाचा भूमिपूजन समारंभ संपन्न.
अकोला : स्थानिक मलकापूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मंगेश काळे मित्र परिवाराच्यावतीने आचार्य मार्कण्डेयजी वत्स श्रीधाम अयोध्याजी यांची श्रीमद भागवत कथेचे दिनांक :- १२ फेब्रुवारी २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत रोज संध्याकाळी ६ ते १० पर्यंत या वेळेमध्ये आयोजन विष्णुराज प्रोव्हिजन जवळ, मलकापूर रोड, अकोला येथे केले आहे. तसेच शेवटच्या दिवसी काल्याचे किर्तन दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ वेळ सायं. ६ होणार आहे त्यानंतर लगेच श्रीमद् भागवत कथेचा समारोप व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन मंगेश काळे व समस्त नागरिक मलकापूर प्रभाग क्र.१४ यांच्यावतीने करण्यात आले आहे. तरी या श्रीमद् भागवत कथेचा तसेच महाप्रसादाचा लाभ मलकापूर परिसरातील भक्तांनी घेण्याचे आवाहन मंगेश काळे यांनी केले आहे. तसेच या श्रीमद भागवत कथेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.