ताज्या घडामोडी

मेहनतीवर विश्वास ठेवा, प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करा पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

> *मेहनतीवर विश्वास ठेवा, प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करा पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा*

 

अकोला, दि. ११ : शिक्षण केवळ गुणांसाठी नसून ते ज्ञानवृद्धी आणि जीवनमूल्य घडविण्याचे साधन आहे. स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन- प्रशासन आपल्यासोबत आहे, अशा शब्दात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षा निकोप वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनानुसार कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. आगामी परीक्षा काळात जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त व भयमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियोजनपूर्वक विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर पारदर्शक परीक्षा प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करून पालकमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.