अकोट-अकोला पॅसेंजर तीन दिवस रद्द
अकोटः दक्षिण मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अकोट-अकोला दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे (गाडीक्र. ७७६०९/७७६१०) तांत्रिक कारणांमुळे ३ ते ५ मे २०२५ पर्यंत तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. ही पॅसेंजर गाडी अकोट ते अकोला आणि परतीच्या मागावर दररोज सेवा पुरवत होती. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक विभागाकडूनआवश्यक देखभाल व सुधारणा कामे होणार असल्यामुळे ही सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यासोबतच. नांदेड रेल्वे विभागातील आणखी सहा गाड्यांची वाहतूकही पुढील तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवास नियोजन करताना याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित रेल्वे स्थानकांवर किंवा अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा, असेही दक्षिण मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.