डीजेच्या तालावर नाचणाऱ्या वरातीवर पडले दगडआनंदाचे रूपांतर शोकात रुपांतरीत, अनेक जखमी
AB7
डीजेच्या तालावर नाचणाऱ्या वरातीवर पडले दगडआनंदाचे रूपांतर शोकात रुपांतरीत, अनेक जखमी
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातीलधोत्रा शिंदे हे गाव एका अनपेक्षित घटनेने हादरले. जिथे नववधू आणि वर यांच्या स्वप्नांना पंख फुटत होते, नातेवाईक आणि मित्रमंडळी आनंदाच्या रंगात रंगले होते, तिथे अचानक तणावाचे आणि भीतीचे वातावरण पसरले. लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या लोकांवर अचानक दगडफेक झाली आणि आनंदाच्या क्षणाचे रूपांतर दुःखात झाले.धोत्रा शिंदे गावात एका मंगलमय सोहळ्याची तयारी अगदी उत्साहात सुरू होती. वधू आणि वर नवीन आयुष्याची स्वप्ने रंगवत होते, तर दोन्ही कुटुंबांतील सदस्य या दिवसाला अविस्मरणीय बनवण्यासाठी उत्सुक होते. ठरलेल्या वेळी, वाजत गाजत, रंगांची उधळण करत वरात निघाली. डीजेच्या तालावर तरुण आणि वृद्धही ठेका धरून नाचतहोते. आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सर्वत्र पसरले होते. वरात एका घरासमोरून जात असताना, डीजेच्या उंचीवरून विद्युत वाहिनीला स्पर्श होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. याच क्षणातून दोन गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. कुणालाही कल्पना नव्हती की हा किरकोळ वाद इतके मोठे रूप घेईल. काही क्षणातच या वादाचे रूपांतरहाणामारीत झाले आणि बघता बघता वरातीवर दगडफेक सुरू झाली.