ताज्या घडामोडी

दहीहंडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत एक पोलीस कर्मचारी आणि त्याचा साथीदार अकोला एसीबीच्या जाळ्यात अडकले

AB7

अकोला: दहीहंडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत एक पोलीस कर्मचारी आणि त्याचा साथीदार अकोला एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. ही कारवाई आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अकोला एसीबी पथकाने केली आहे. या प्रकरणांमध्ये ठाणेदार, हेड कॉन्स्टेबल आणि एक महिला पोलीस  कर्मचारी यांचा समावेश असल्याचे तपासात समोर येत आहे. दहीहांडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल दिंडोकार आणि एक खाजगी इसम शंकर जानराव तरोळे हे जाळ्यात अडकले असून, दहीहंडा पोलिस स्टेशनला जवळ असलेल्या हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. एसीबीने केलेल्या कारवाईत पोलिस शिपाई प्रफुल्ल दिंडोकार, खाजगी इसम शंकर तरोळे यांच्यावर दहीहांडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.एन सी प्रकरणांत प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रार कर्त्याला ह्या पोलिस कर्मचाऱ्याने 8 हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारकर्ताला लाच द्यायची नसल्याने त्याने अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रीतसर तक्रार दिली होती.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणी कारवाईत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने आज सापळा लावण्यात आला होता. त्यात खाजगी इसमाच्या हातून लाचेची रक्कम घेत असताना  पोलिस कर्मचारी अडकला. दोन्ही आरोपी विरुद्ध दहीहंड्याच्या पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.सदरहू कारवाई अकोला एसीबीचे उप अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन सावंत, कारवाई पथकातील पो.कॉ. प्रदीप गावंडे, दिगंबर जाधव व संदीप ताले यांनी केली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.