मित्रहो …आजच्या दिवशी ही बातमी मला फार अस्वस्थ करून गेली. प्रशासनातील जबाबदार अधिकारी जर असं वागणार असतील …आणि हे काही चुकूनमाकून झालेलं नाही. हे सर्व ठरवून आणि मोठमोठ्या रकमा घेऊनच झालेलं आहे , यात शंका नाही .अशा प्रकारच्या…. खरंतर , हे खरे देशद्रोही… अशा अपराध्यांना परदेशांमध्ये , आखाती प्रदेशांमध्ये …सरळ सरळ महिन्याभरात , भर चौकात लटकवलं जातं …आणि म्हणून कदाचित अशा प्रकारचे अपराध तिकडे फार कमी होत आहेत. पण , आपल्याकडे याचा एकदम सुकाळ आहे. प्रशासनामध्ये असे अधिकारी भरती होतात …आणि अलीकडच्या काळामध्ये तर केवळ अफाट पैसे कमावणे , हा एकच उद्देश बाळगून सर्वच खात्यामध्ये अधिकाऱ्यांची भरती होत आहे. अधिकारी निवड झाल्यानंतर प्रशासकीय सेवेत तो कसा वागतो.. यावर कोणाचेही लक्ष असत नाही. कारण पैसा… भ्रष्टाचाराची गंगा… ही खालून वर नाही …तर वरून खाली वाहत असते …आणि त्यामुळे जास्तीत जास्त सगळेच ….जितके होईल तितके… एकमेकांना सदोदीत वाचवण्याची धडपडच करत असतात. आणि …अशा प्रशासकीय सेवेत जर प्रामाणिक अधिकारी सापडला , तर त्याचा सगळे ठरवून अभिमन्यू करून टाकतात ! चक्रव्यूह तयारच होतो ..त्याला वेळ लागत नाही …कारण अशा अधिकाऱ्याला हे सगळे घाबरत असतात …किंबहुना त्या आरशात त्यांना स्वतःची मलीन प्रतिमा सातत्याने घाबरवून टाकत असते.. आणि म्हणून त्याला येनकेन प्रकारे ..मातीत गाडलं जातं .त्यामुळे , अलीकडच्या काळात आता प्रामाणिक अधिकारी कुठेही दिसत नाही .भ्रष्टाचाराची परिसीमा… भ्रष्ट अधिकाऱ्यांची हिम्मत आता इतकी वाढली आहे की , त्यांना देशाच्या सुरक्षेबद्दलही यत्किंचितही चिंता वाटत नाही …हे या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे . या तहसीलदाराला.. बांगलादेशहून आलेल्या घुसखोरांना जन्माचे दाखले देताना जरा ही शरम वाटली नाही .असेच अधिकारी हा देश खड्ड्यात घालतात ! आभाळ फाडून टाकतात …किती ठिकाणी ..किती जणांनी शिवायचं हा फार मोठा प्रश्न आहे . आताच्या काळात फार जटील प्रश्न झालेला आहे. एकटे मोदीजी किंवा एकटे योगीजी काय करणार हो ? कारण आपल्याकडील कायद्यामध्ये.. प्रशासकीय नियमांमध्ये ..अशा भ्रष्ट लोकांविरुद्ध तडकाफडकी कारवाई करण्याचे काही नियमच नाहीत , कडक कायदे नाहीत .निलंबित करून चौकशी लांबवली जाते. त्यातही पैसे पेरून सुटका केली जाते. कोणी कोणाला बोल लावायचे ?तेरी चूप मेरी भी चूप या न्यायाने हे सगळं असंच चालू आहे… या बातमीतील तहसीलदारांनं… हे जे काही नीच कर्म केलेलं आहे ..त्याला जरा तरी कल्पना आहे काय ? की या कर्माची फळ अवघ्या देशाला भोगावी लागणार आहेत. या देशातील , धर्माधिष्ठित समाजाला कुर्तडत राहणार आहेत. तेव्हां, हा अधिकारी मिळालेले पैसे घेऊन कुठेतरी कोपऱ्यात मजा करत बसलेला दिसणार आहे …आणि एक दिवस हेच बांगलादेशी त्याच्या सकट या समाजाला गिळणार आहेत याची जरा देखील त्याला जाणीव नाही .त्याला याची जाण नाही .त्याला दिसतो तो फक्त पैसा …फक्त पैसा.. आणि फक्त पैसा ! त्याला कधी देश दिसत नाही.. त्याला कधी धर्म दिसत नाही …किंवा या समाजाप्रती आपल्या कर्तव्याची त्याला जाणीवही होत नाही . अशा अधिकाऱ्यांची निवड लोकसेवा आयोगाकडून केली जाते , त्यामुळे भ्रष्टाचाराची ही कीड कुठपर्यंत पोहोचलेली आहे हे आपल्या लक्षात येईल .अशा या भीतीदायक वातावरणामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहायचं ? कोणाच्या आधारावर जगायचं ? प्रशासनातले हे असे अधिकारी …आणि हा काही एकटा नाही , पकडला गेला म्हणून चोर ! बाकी , या वाटेवर खूप प्रवासी अजून बाकी आहेतच. त्यांचे चेहरे अजून उघडे व्हायचे आहेत. परंतु , ज्या कुणी अशा लोकांना प्रशासनात भरती केलेलं आहे त्यांना जाब कोण विचारणार ? शेवटी नियती आपल्या परीने याचा न्याय करेल हे जरी खरे असले… तरी तोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन किती असह्य होऊन जाणार आहे , याची कल्पना न केलेली बरी .या देशाच्या …या समाजाच्या ….हिंदू धर्माच्या सुरक्षेची चिंता सतत वाढतेच आहे .शेवटी कोण बरं आहे आपला रक्षणकर्ता ? सर्वसामान्यांनी कोणाकडे बऱं पाहावे ? हेच मुळी समजत नाही. अशा हरामखोरांना सामाजिक पातळीवर बहिष्कृत करायला नको काय? तरीही आपण आशा सोडत नाही.. आणि केव्हातरी सूर्योदय होईल या आशेत सर्वसामान्य नागरिक जीवन कंठत आहेत यात संशय नाही !! जय हिंद… संजीव कोकीळ