नायब तहसीलदाराच्या आदेशाला तलाठी व मंडळ अधिकाऱ्यानी दाखवली केराची टोपलीसंबंधित 32 प्लॉट धारकाच्या नोंदी न झाल्यास तहसील कार्यालयासमोर शिवसेना (उ.बा ठा)चा आमरण उपोषणाचा इशारा
AB7
नायब तहसीलदाराच्या आदेशाला तलाठी व मंडळ अधिकाऱ्यानी दाखवली केराची टोपलीसंबंधित 32 प्लॉट धारकाच्या नोंदी न झाल्यास तहसील कार्यालयासमोर शिवसेना (उ.बा ठा)चा आमरण उपोषणाचा इशारा
मलकापुरः- दाताळा भाग दोन येथील गट नंबर 961 चे हस्तलिखित गाव नमुना 7/12 नुसार संगणीकृत गाव नमुना 7/12 ला व नमूद केल्याप्रमाणे तक्ता क्रं. 1 मधील खातेदाराच्या नावासमोर रकाना क्रं 4 नुसार क्षेत्रफळाची नोंद घेण्यात यावी तसेच तक्ता क्र.2 नुसार संगणीकृत गाव नमुना 7/12 ला दुरुस्ती करून गटातील उर्वरित 119.64 चौ.मी क्षेत्र बन्सीलाल सुरेश धुत मूळ मालकाचे नावे नोंदविण्याबाबत नियमानुसार उचित कारवाई करावी व अद्यावत गाव नमुना 7/12 ची प्रत सर्व संबंधितांना देण्यात यावी असा लेखी आदेश नायब तहसीलदार यांचा दि. 07 ऑक्टोबर 24 चा असतांनाही तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सदर आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. मौजे दाताळा येथील गट नंबर 961 मधील अशपाक खारहीम उल्लाखा, जगन्नाथ सुपडा ढवळे, लता दिनकर बढे, एकनाथ निवृत्ती तायडे, सुरेश सखाराम चोपडे, माधव जयराम तायडे, सुपडा मोतीराम सोनोने, बळीराम शामराव खर्चे, रवींद्र रामभाऊ तायडे, दामोदर रामा वराडे, माधव जयराम तायडे, रमेश गोविंदा बढे, दिनकर अंबादास जोशी, गजानन अंबादास जोशी, ओंकार नामदेव चौधरी,तदार तथा तालुकाहरिभाऊ लक्ष्मण देशमुख, अर्चना संतोषसिंग राजपूत शंकर सिताराम नारखेडे, जनार्दन एकनाथ देशमुख, श्रीराम नथ्थु नाफडे, शंकर रघुनाथ चौधरी, किशोर निवृत्ती चौधरी, योगेंद्र विजय महाजन व इंदुबाई विजय महाजन, संगीता भरत चौधरी, विलास पुरुषोत्तम खर्चे, वासुदेव वामन नाफडे, सिंधू सदाशिव नाफडे, नैनेश परमेश्वरसिंह राजपूत, भास्कररामकृष्ण तायडे, संतोष रमेश पाटील, सुपडा मोतीराम सोनोने, बन्सीलाल सुरजमल धूत यांच्या नावाने सातबारा दक्ता क्रं 1 मधील खातेदाराचे नावासमोर रकाना क्र.4 नुसार क्षेत्रफळाचे नोंद घेण्याबाबत आदेशित करण्यात आले होते मात्र मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आदेशाला केराची टोपली दाखवल्याने पंधरा दिवसाच्या आत संबंधित प्लाट धारकांना सातबारा द्यावा अन्यथा दि. 7 एप्रिल 2025 रोजी तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील असा इशारा तहसीलदार तायडे यांना एका निवेदनाद्वारे शिवसेना (उ.बा.ठा) शहर प्रमुख गजानन ठोसर, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी यांनी दिला आहे.