नांदुरा शहरात पोलिसांचा रूटमार्च
नांदुरागुढीपाडवा, रमजान ईद आदि सण उत्सवाच्या पार्श्वभूमिवर २५ मार्च रोजी सकाळी ११.३५वा ते १२.१० वा. पावेतो शहरात पोलीस स्टेशन-उस्माना चौक-मीहानी चौक ताज गेट – घासमंडी-सरकारी दवाखाना-पेट मोहल्ला -कुरेशी मज्जिद-टाकळकर | पानपट्टी-पोलीस स्टेशन यामार्गाने पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्च दरम्यान नागरिकांना सोशल मीडियाचा जपून वापर करावा, काही आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास त्वरित पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा याबाबत सूचना दिल्या. सदर रूट मार्च करिता पोलीस स्टेशन नांदुरा येथील ०४ अधिकारी, ३५ अंमलदार हजर होते.