दुधात भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका लावा बैठकीत अजित पवारांचे आदेश
मुंबई : भाजप आमदार विक्रमसातपुते यांनी अधिवेशन काळात बनावट पनीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना या बैठकीत अजित पवारांनी दिल्या आहेत. दूध आणि तत्सम अन्नपदार्थात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही. दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा,’ असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.अॅनालॉग चीज हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी अॅनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याबाबत तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातीलभोसे येथे उघडकीस आलेल्या दूध भेसळीसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील समिती कक्षात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.’दुधातील भेसळ तपासण्यासाठी तातडीने प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करावी, पनीरमध्ये अॅनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. दध भेसळीसंदर्भात जनजागृती करण्यात यावी, भेसळी संदर्भात जनतेला तक्रारी नोंदवण्यासाठी