इन्कलाब सेवा समितीच्या वतीने शेख रमजान यांचा सत्कार
अकोला – नायगाव ते वाकापूर पुलाचे काम पूर्ण झाले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रोडाचे काम देखील झाले. नायगाव ते वाकापूर पुल दळणवळण साठी, विद्यार्थी व नागरिकांसाठी हा पुल बनविण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महानगर संघटक सचिव शेख रमजान यांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले व त्याचा पाठपुरावा देखील करण्यात आला. अखेर शेख रमजान यांच्या कामाला यश मिळाले हा पूल मोर्णा नदीवरून बनविण्यात आला या पुलासाठी अंदाजे अडीच करोड रुपये लागत झाली. दळणवळण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास होत होता व विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोरणा नदीतून जावे लागत होते. नायगाव ते वाकापूर पुल बनविण्यात यावे यासाठी झटणारे शेख रमजान यांचा सत्कार इन्कलाब सेवा समितीचे वतीने करण्यात आला . यावेळी इन्कलाब सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद एजाज बाबा व पदाधिकारी व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.