ताज्या घडामोडी

अकोल्यात भरणार दि 31जानेवारी ते 4 फेबृवारी प्रर्यंत पाच दिवसांची ‘व-हाडी जत्रा’*

AB7

चला प्रदर्शनाला, चला वऱ्हाडी जत्रेला विभागस्तरीय व जिल्हास्तरीय मिनी सरस प्रदर्शन व विक्रीग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री*अकोल्यात भरणार दि 31जानेवारी ते 4 फेबृवारी प्रर्यंत पाच दिवसांची ‘व-हाडी जत्रा’*

अकोला : व-हाडची संस्कृती, खाद्यपदार्थ, ग्रामजीवन यांचे दर्शन घडविणारी ‘व-हाडी जत्रा’ अकोल्यातील शास्त्री क्रीडांगणात दि. 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारीदरम्यान भरणार आहे. महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान ‘उमेद’तर्फे ‘व-हाडी जत्रा’ हा मिनी सरस महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व या समूहांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील महिलाभगिनींनी बचत गटाच्या माध्यमांतून तयार केलेली विविध उत्पादने या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.उपक्रमाचे परिपूर्ण व वैविध्यपूर्ण नियोजन, व्यापक प्रसिद्धी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. व-हाडी जत्रेत ग्रामीण कलाकुसर, खाद्यपदार्थ, मसाले व इतर उत्पादनांची सुमारे 80 दालने असतील. त्याशिवाय प्रत्येक सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम वेळ सायंकाळी ६ ते ९ त्या मध्ये किशोर बळी हास्य डॉट कॉम 31 जानेवारी 2025 (शुक्रवार) शुभम सातपुते सुर नवा ध्यास नवा हिंदी व मराठी गीते 1 फेब्रुवारी 2025 (शनिवार) गजर महाराष्ट्रचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन 2 फेब्रुवारी 2025 (रविवार) प्रा. दीपक तडाखे प्रस्तुत, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा 3 फेब्रुवारी 2025 (सोमवार) अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक मनोज जाधव, ‘उमेद’चे जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र काकड यांनी केले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.