हातरूण गावात एकाच समुदायातील दोन गटात तुफान हाणामारी
अकोला: जिल्ह्यातील हातरूण गावात एकाच समुदायातील दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. प्राप्त प्राथमिक माहितीनूसार, पोलिसात आपल्या विरोधात तक्रार दिल्याच्या संशयावरून एका गटातील काही जणांनी दुसऱ्या गटावर हल्ला चढविला. यानंतर दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली यामध्ये एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली. या हल्ल्यात सुमारे 6 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. तर हल्ल्यात जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . यामध्ये एका जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर हातरूण गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जखमींची मध्ये शेख मलंग शेख मोहम्मद वय 55, शेख साजिद अब्दुल कादर वय 35, अब्दुल रहमान शेख मोहम्मद वय 58 अशी आहेत. शेख साजिद यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.