ताज्या घडामोडी

उद्यापासून तीन दिवस उसळणार प्रदर्शनीत गर्दी

सतीश पवार AkolaB7अकोला

> *यंदाच्या रॅम्पकॉन प्रदर्शनीचे ज्युनियर अमिताभ बच्चन राहणार आकर्षण*

उद्यापासून तीन दिवस उसळणार प्रदर्शनीत गर्दी

अकोला : पश्चिम विदर्भातील बांधकाम व स्थापत्य क्षेत्रात बांधकाम व स्थापत्य विश्वाची माहिती, तंत्रज्ञानाची रेलचेल असणाऱ्या असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, अकोला व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, अकोलाच्या ‘ॲडव्हान्समेंट इन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अर्थात रॅम्पकॉन प्रदर्शनीचा प्रारंभ शनिवार, २५ जानेवारीपासून स्थानिक मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात होत असून, ही प्रदर्शनी २७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यंदा या प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण दस्तुरखुद्द ‘बिग बी’ अमिताभ बच्चन ज्यांची सदैव प्रशंसा करतात असे ‘ज्युनिअर अमिताभ बच्चन’ हे राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत ही प्रदर्शनी साकार होणार आहे. या प्रदर्शनीत बांधकाम क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान, साहित्य, डिझाईन, सेवा यांचे दर्शन घडणार असून, १०० पेक्षा जास्त स्टॉल्स साकार करण्यात आले आहेत. यात सिमेंट, काँक्रीट, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल्स, टाइल्स, हार्डवेअर, फर्निचर, सजावट साहित्य, गृहनिर्माण योजना, फायर फायटिंग सिस्टिम्स, इंटिरियर डिझाइन, क्रॅक रिपेअर तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती, वित्तीय व्यवस्थापन समवेत गृहोपयोगी विषयाचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत, या प्रदर्शनीत बांधकाम व स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चासत्रे होणार असून, यातून उद्योजक, कंत्राटदार, अभियंते, आर्किटेक्ट, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम विश्वाचे नवीन ज्ञान मिळणार आहे. या प्रदर्शनीला सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन सचिव अभिजित परांजपे, एसीसीईचे चेअरमन श्यामसुंदर साधवानी, एसीसीईचे सचिव अनुराग अग्रवाल, एसीसीईचे कोषाध्यक्ष रिझवान कुरेशी, एसीसीई केंद्रीय समिती सदस्य पंकज कोठारी, इस्माईल नजमी, आयआयए केंद्रीय सदस्य सुमीत अग्रवाल, आयआयए चेअरमन कमलेश कृपलानी, सचिव सर्वेश केला, कोषाध्यक्ष मनीष भुतडा, एसीसीएई व आयआयएचे अजय लोहिया, मनोज मोदी, संजय भगत, नरेश अग्रवाल, ईश्वर आनंदानी, जयप्रकाश राठी, अतुल बंग, आर्कि. शैलेश वखारिया, किरण देशपांडे, चन्द्रशेखर मुखेडकर, अमित राठी, मयूर सिंघानिया, राजेश लोहिया, कपिल ठक्कर, श्याम ठाकूर, नीलेश मालपाणी आदींनी केले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.