ताज्या घडामोडी

देश पातळीवरील राष्ट्रीय लोक आंदोलनात सहभागी होण्याचे जागरूक नागरिकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन

सतीश पवार

देश पातळीवरील राष्ट्रीय लोक आंदोलनात सहभागी होण्याचे जागरूक नागरिकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन

अकोला : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व कार्यकारणी बरखास्त करून आता नव्याने देश पातळीवरील संघटन राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास स्थापन करण्यात आले असून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व सकारात्मक कार्य करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या देश पातळीवरील राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास च्या अकोला जिल्ह्यात जिल्हा संघटन बांधणीचे कार्य पाच राज्यातील संघटन बांधणीचे कार्य संपल्यानंतर महाराष्ट्रात संघटन बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अकोला जिल्ह्यात संघटन बांधणीच्या कार्याला सुरुवात झाली आहे .त्या माध्यमातून जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारिणी, तसेच गाव तिथे शाखा स्थापन करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. ज्यांना समाजकार्याची आवड आहे. तसेच भ्रष्टाचाराची चीड आहे अशा निस्वार्थ जागरूक युवकांनी, महिलांनी ,पुरुषांनी या संघटनेत सहभागी होण्याकरता अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष गजानन ओंकार हरणे, जिल्हा परिषद नगर खडकी अकोला किंवा मोबाईल नंबर 9822942623 या मोबाईल नंबर वर आपला संपूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर चा मेसेज पाठवावा त्यांना होणाऱ्या मीटिंगमध्ये बोलावून जबाबदारी देण्यात येणार आहे. राळेगणसिद्धी येथून पद्मभूषण जेष्ठ समाजसेवक अध्यक्ष अण्णा हजारे, कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार , सचिव अशोक सब्बन, खजिनदार दत्ता आवारी, यांच्या मार्गदर्शनात हे संघटन बांधणीचे काम सुरू झाले असून ज्या कार्यकर्त्यांची निवड पदाधिकारी म्हणून होणार आहे .त्यांना एक दिवशीय कार्यशाळे करता राळेगणसिद्धी येथे पाठवून तिथे त्यांना त्यांचे नियुक्तीपत्र पद्मभूषण मा. अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. म्हणून अकोला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते भ्रष्टाचाराची चीड असलेल्या जागरूक नागरिकांनी तसेच जुन्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा त्वरित जन आंदोलनात सहभागी होण्याचे, संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रीय लोक आंदोलनाचे अकोला जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन हरणे यांनी जिल्ह्यातील सर्व जागरूक नागरिकांना केले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.