महाराष्ट्रराजकीय

अखेर जरांगे पाटलांकडून पत्ते ओपन ; या तीन जातींवर लावणार मोठा डाव, अंतरवालीमधील आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

मनोज जरांगे पाटील यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरवालीमध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांची निवडणुकीचा फॉर्म भरण्यसाठी लगबग सुरू आहे. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यंदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. ज्या ठिकाणी उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे, तिथे उमेदवार देणार आणि जिथे शक्यता कमी वाटते, तिथे जे उमेदवार आमच्या मागण्यांना समर्थन देतील त्यांना पाठिंबा देणार अशी भूमिका मनोज  जरांगे पाटील यांनी मांडली आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा या सर्व पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

समीकरण जुळणं अत्यंत आवश्यक आहे, एका जातीवर निवडणूक लढवल्या जात नाहीत. तुम्ही इकडे गर्दी करू नका, तुम्ही इकडे गर्दी केली की मला काही काम सुचत नाही. मराठा, मुस्लिम, दलित एकत्र यायला पाहिजे, मग राज्यात शंभर टक्के परिवर्तन होऊ शकतं. समाज निर्णय प्रक्रियेत उभा राहणार आहे का? हे बघणं महत्त्वाचं आहे. 30 तारखेला दलित मुस्लिम मराठा यांचा काय निर्णय बाहेर निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या इतके भावी आमदार झालेत. पण मतदारसंघ कमी आहेत.  नाराज होऊन शे दीडशे भावी आमदार नाराज होतील, मात्र मी सहा कोटी मराठा समाजाला नाराज करणार नाही. दीडशे दोनशे लोकांसाठी सहा कोटी मराठा समाजाचं वाटोळं करणार नाही. राज्यात आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोठे साहेब तिथे बसले आहेत, उपसरपंचाच्या हातात सगळं आहे. फडणवीस साहेब आहेत ते सगळं सरकार जोडत आहेत. किसे कापू, छेटे, मोठे हे सगळे जोडत आहेत.  यावेळेस उपसरपंचाचा कार्यक्रम शेतकरी करणार आहेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.