देवेंद्रजी, अधिवेशनापूर्वी कर्जमाफी द्या; अन्यथा घेराव घालू, ट्रॅक्टर मोर्चाद्वारे इशारा!उद्धवसेनेचा हल्लाबोल : उन्हात ट्रॅक्टर मोर्चा धडकला
AB7
देवेंद्रजी, अधिवेशनापूर्वी कर्जमाफी द्या; अन्यथा घेराव घालू, ट्रॅक्टर मोर्चाद्वारे इशारा!उद्धवसेनेचा हल्लाबोल : उन्हात ट्रॅक्टर मोर्चा धडकला
अकोला: विधानसभा निवडणुकीतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सत्ता स्थापनेला सहा महिन्यांचा कालावधी होऊनही मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली नाही. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास नागपूर येथे शेतकऱ्यांसह विधिमंडळात घेराव घालण्याचा इशारा उद्धवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी दिला. शुक्रवारी (दि. २) आयोजित ट्रॅक्टर मोर्चात त्यांनी सरकारवर हल्लाबोल चढविलाकर्जमाफी घोषित करण्याच्या मागणीसाठी उद्धवसेनेचे उपनेते आ. नितीन देशमुख याच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मौर्याचे आयोजन करण्यात आले होते. भर उन्हात असंख्य शेतकरी ट्रैक्टर घेऊन दाखल झाले होते. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या १७ दिवसांतच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. सरकारला शेतकऱ्यांचे परिवार उद्ध्वस्त करायचे नसतील तर सातबारे कोरे करावेत. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देतात, तर दूसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पठार असमर्थता दर्शवितात, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव असल्याची टीका आ. देशमुख यांनी केली.तरुणांना भरकवटण्याचा प्रयत्नशेतमालाला हमीभाव, सिंचनासाठी पुरेशी वीज, योग्य दरात खते, बी-बियाणे उपलब्ध करून देण्यापेक्षा राज्य सरकारकडून तरुणांच्या डोक्यात भगवा, हिरवा रंग टाकून मूळ मुद्द्यापासून भरकटण्याचे काम केले जात असल्याची टीका प्रहारचे सर्वेसर्वा, भाजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. शेतकन्यांच्या हितासाठी कोणत्याही पक्षाने आंदोलन केल्यास पक्षभेद विसरून त्यात सहभागी होईल. शासनाने कर्जमाफीचा निर्णय त्वरित न घेतल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला…तर आत्महत्या करावी लागेल!बाळापूर तालुक्यातील बाखराबाद या गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील श्रीमती किरण दिनेश माळी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलासह मोर्चात सहभागी झाल्या होत्या. निसर्गाची अवकृपा आणि कर्जाचा डोंगर वाढल्याने पतीने आत्महत्या केली शेतमालाला हमीभाव व खते, बियाण्यांचा काळाबाजार होऊ न देता किमती स्थिर ठेवल्यास शेतकऱ्यांना मोलाची मदत होईल. याकडे शासनाचे अजिबात लक्ष नाही. सातबारा कोरा न झाल्यास माझ्यावरही आत्महत्येची वेळ येईल, अशी भावना त्यांनी जाहीररीत्या व्यक्त केली.२rमे रोजी आयोजित मोर्चात जिल्हाप्रमुख मंगेश काळे, माजी आमदार दाळू गुरुजी, संजय गावडे, अनिरुद्ध देशमुख, महिला संघटिका सरिता वाकोडे यांनीही महायुती सरकारचा खरपूस शब्दात समाचार घेतला. यावेळी आ. देशमुख, दिलीप बोचे, विकास पागृत, ज्ञानेश्वर स्टेसने, राजेश मिश्रा यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले: