गोंधळी समाज विकास मंडळ (महाराष्ट्र राज्य) या आपल्या सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६-०० वाजता दुर्गा देवी मंदिर लोकमान्य नगर अकोला येथील तुळजाभवानी सभागृहासमोरील प्रांगणात आपल्या हिंदूंचे दैवत असलेले प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी मंडळातील सर्व पदाधिकारी यांना कळविण्यात येते की त्यांनी न चुकता वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.गोंधळी समाज विकास मंडळ, संस्थापक अध्यक्ष, प्रकाश पुंडलिक भागवत, यांनी आवाहन केले