आपला जिल्हा

जानेवारीला पत्रकार दिन सोहळा आयोजीत*

Akola B7

> *6 जानेवारीला पत्रकार दिन सोहळा आयोजीत*

 

> *अकोला जिल्हा पत्रकार संघाचा उपक्रम* 

 

अकोला : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीत राज्यभर साजरा होणारा पत्रकार दिन सोहळा दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सोमवार दिनांक 6जानेवारी 2025रोजी स्थनिक निमवाडी परिसरातील पत्रकार भवनातील स्व. पन्नालाल शर्मा सभागृहात दुपारी 3 वाजता आयोजीत आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात शिक्षण तज्ञ, प्रभात शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. गजानन नारे, जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी श्री हर्षवर्धन पवार, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. सिद्धार्थ शर्मा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सन 1832 मध्ये 6 जानेवारीला दर्पण नावाचे मराठी, इंग्रजी वृतपत्र सुरु केले होते. या वृत्तपत्राच्या नावावरूनच बाळशास्त्री यांना दर्पणकार ही लोक उपाधी मिळाली होती. महाराष्ट्र राज्यात तेंव्हापासून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो. मराठी पत्रकार परिषद मुंबई शी गेल्या 50 वर्षापासून संलग्न असलेल्या अकोला जिल्हा पत्रकार संघा तर्फे दरवर्षी हा सोहळा मान्यवर लोकांच्या उपस्थितीत साजरा होतो. सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता हा सोहळा सुरु होईल. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावाचे जेष्ठ पत्रकार, संपादक, स्तंभलेखक श्री राजेशजी राजोरे यांनी महाराष्ट्रातील उत्कृष्ठ समाजाभीमुख कार्य करणाऱ्या व स्वतःचे पत्रकार भवन असणाऱ्या निवडक 15 जिल्हा पत्रकार संघाना आद्य पत्रकार दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांचे अर्धाकृती पुतळे भेट दिले आहेत. दर्पणकार बाळशास्त्री यांच्या या पुतळ्याचे कार्यक्रमापूर्वी विधिवत पूजन करण्यात येईल.पत्रकार भवनात आयोजित या सोहळ्याला सर्व पत्रकार बंधू -भगिनींनी उपस्थितीत राहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजूरकर, उपाध्यक्ष गजानन सोमाणी, रामदास वानखडे, चिटणीस विजय शिंदे, प्रदीप काळपांडे, अविनाश राऊत, राजु उखळकर, जयेश जगड तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे, दिलीप देशमुख, मंगेश लोणकर, प्रल्हाद ढोकणे, अमोल जामोदे, कार्यालयीन सचिव कमलकिशोर शर्मा, प्रसिद्धी प्रमुख विलास खंडारे, महिला पत्रकार प्रतिनिधी ऍड निलिमा शिंगणे, वंदना शिंगणे, आदींनी केले आहे.

 

 

 

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.