झूलेलाल जयंती महोत्सवाची तयारी जोमात 1111महिला पुरुषांची होणार महाआरतीव अनेक रंगारंग कार्यक्रमाची राहणार रेलचेल
AB7
झूलेलाल जयंती महोत्सवाची तयारी जोमात 1111महिला पुरुषांची होणार महाआरतीव अनेक रंगारंग कार्यक्रमाची राहणार रेलचेल
अकोला : गत 28 वर्षांपासून महानगरात सिंधी समाजाचे सर्वोच्च पर्व चेट्री चंड इष्ट देवता श्री झूलेलाल यांची जयंती साजऱ्या करणाऱ्या पूज्य सिंधी जनरल पंचायतच्या झूलेलाल महोत्सव समितीच्या वतीने झूलेलाल जयंती महोत्सव होत असून त्याची तयारी समितीच्या वतीने जोमात सुरू झाली आहे. झूलेलाल जयंती महोत्सवचे अध्यक्ष ब्रह्मानंद वलेचा यांच्या अध्यक्षतेत यावर्षी महिला, पुरुष,युवक व युवतीसाठी नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.दि 16 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत सिंधी कॅम्प परीसरातील संत कवरराम प्रांगणात आयोजित या महोत्सवातील उपक्रमाना रविवार दि 16 मार्च रोजी स 8 वाजता भव्य बॅडमिंटन स्पर्धा पासून प्रारंभ होणार आहे.सोम दि 17 मार्च ते 19 मार्च पर्यंत महिलांसाठी साय 5 वाजता टर्फ क्रिकेट स्पर्धा व रात्री व्हालीबॉल स्पर्धा होणार आहे.गुरुवार दि 20 मार्च रोजी साय 7 वाजता महिलांसाठी संगीत खुर्ची, खो खो,हळू सायकल स्पर्धा होणार आहेत. शुक्रवार दि 21 मार्च रोजी मातृपितृ पूजन कार्यक्रम, शनिवार दि 22 मार्च रोजी सिंधियत जा सुहिणा गुल हा नाट्य कार्यक्रम,रविवार दि 23 मार्च रोजी स 9 वाजता कॅरम व बुद्धीबळ स्पर्धा, सकाळी 11 वाजता सुदृढ बालक स्पर्धा व
भव्य गरबा रास सोहळा होणार आहे. सोमवार दि 24 मार्च रोजी भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे.मंगळवार दि 25 मार्च रोजी बाबल प्यारो जलगांव वालो हा मिमिक्री कार्यक्रम होणार आहे बुधवार दि 26 मार्च रोजी स 9 वाजता भव्य रक्तदान शिबिर व सायंकाळी जर्णी ऑफ सिंधिज हा समाजाच्या विकासाचा आलेख असणारा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दि 27 मार्च रोजी रिशते आणि रंग हा कार्यक्रम,शुक्रवार दि 28 मार्च रोजी टलेंट हंट, शनिवार दि 29 मार्च रोजी साय 6 वाजता रांगोळी व सिंधी प्रिन्स स्पर्धा होणार आहे.मुख्य महोत्सव झूलेलाल जयंती अर्थात चेट्री चंड सोहळा हा रविवार दि 30 मार्च रोजी होणार असून या दिनी सकाळी 9 वाजता भगवान झुलेलाल पूजन सोहळा होऊन सकाळी 10 वाजता जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा व सकाळी 10-30 वाजता 1111 महिला पुरुषांचा महाआरती कार्यक्रम व स 11 वाजता प्रसाद वितरण होणार आहे.दु 4 वाजता चेट्री चंडची भव्य शोभायात्रा महानगरात निघणार आहे.महोत्सवातील उपक्रमाचा समारोप रविवार दि 6 एप्रिल रोजी साय 6 वाजता भव्य आनंद मेळ्याने होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी समाजाच्या महिला पुरुषांनी माणिक वाधवाणी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले असून समाजाने यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महोत्सव समितीचे अध्यक्ष ब्रह्मानंद वलेचा,महासचिव संजय नागदेव, कोषाध्यक्ष नरेंद्र (डब्बू) भाटिया, सहकोषाध्यक्ष अलकेश कृपलानी, उपाध्यक्ष रामचंद्र आहुजा, महेश गलानी,महेश मनवाणी,अनिल परयानी, नंद आलिमचंदानी,धमन राजपाल, वासुदेव पपली आनंदानी,मनोहर मोटवाणी,जगदीश रायकेश, अमर कुकरेजा,सचिव रवी मेठाणी, दीपक जाधवानी,सनी जसमतीया,रवी आनंदानी,मोहन मुलानी,विजय आहुजा,कैलास जेठानी,मुकेश फुलवाणी,प्रकाश कावना, राजकुमार डोडेजा समवेत समस्त पदाधिकारी वर्गाने केले.