ताज्या घडामोडी

आज स्वराज्य भवन येथे मूर्ख संमेलनाचे आयोजन* > *उत्सवाला पाच दशकांची परंपरा*

AB7

> *आज स्वराज्य भवन येथे मूर्ख संमेलनाचे आयोजन*

 

> *उत्सवाला पाच दशकांची परंपरा*

अकोला : जिल्ह्यात प्रसिद्ध असे होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी ला होणारे मूर्ख संमेलन शुक्रवार ता.१४ मार्च रोजी स्वराज्य भवन अकोला येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे यंदाचे हे ५३ वे वर्ष आहे. होळीच्या शुभ पर्वावर अकोल्यात मूर्ख संमेलनाची परंपरा आहे. गेल्या ५२ वर्षापासून ही परंपरा आजतागायत कायम असून यंदाचे उत्सवाचे ५३ नावे वर्ष आहे. संस्थापक स्व. रामकिशोर श्रीवास गुरुजी यांनी या उत्सवाची सुरुवात केली होती. यंदा १४ मार्च रोजी स्वराज्य भवन येथे सायंकाळी ६ वाजता उत्सव साजरा होणार आहे. तरी या उत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्ष विशाल प्रदीप शर्मा कार्यकारी संयोजक सर्वेशचंद्र कटियार, संयोजक डॉ. प्रा. कोमल राजेंद्र श्रीवास यांनी केले आहे.

 

> “*या कलाकारांचा समावेश*

मूर्ख संमेलनात शाहीर वसंत मानवटकर, महादेवराव भुईभार, उमेश उर्फ डब्बू शर्मा, अँड अनंत खेळकर, किशोर बळी, शिवलाल माझोडकर, भारत बरोटे, ऋषीकेश बरोटे, देविदास चव्हाण, प्रशांत गवई, नामदेव गवळी, विशाल राखुंडे, कैलास शिरसाठ, श्रावणी जैन, एस कुमार सदांशिव, तुलसी साळुंखे, भक्ती साळुंखे, दर्शनी राजूरकर, रवी खंडारे, सुनील लबडे, जानवी पालनकर, विद्या इंगळे, विशाल वाघमारे, प्रशांत मुंडे, परिपाकरे श्रावण कुमार मस्ताना, विकी मेश्राम, हिम्मत किशोरीलाल ढाले आदींचा समावेश आहे.

> *मूर्खाधीराजची निघणार मिरवणूक*

मुर्खाधिराजची सिटी कोतवाली मागून दुपारी ४ वाजता स्वराज्य भवन पर्यंत जुलूस मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, महानगरपालिका, प्रमिलाताई ओक हॉल, स्वराज भवन च्या प्रांगणापर्यंत जाईल. यामध्ये जनतेने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने केले आहेत

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.