*मातंग समाजाचे राज्यस्तरीय उप वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन*
*वेदांतिका कला क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेने केले आयोजन*
अकोला येथे 18 जानेवारी 2025 रोजी मातंग समाज उप वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन वेदांतिका क्रीडा कला शैक्षणिक व बहुद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या या वधू-वर परिचय मेळाव्याला महाराष्ट्रातून व विदर्भातून मातंग समाजातील उपवधू वर यांनी आपला सहभाग नोंदवावा व गरीब समाजातील होत असलेल्या आर्थिक नुकसानीला आळा बसावा व एकाच व्यासपीठावर वधू वर मिळावे हा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोन समोर ठेवून *वेदांतिका कला क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था तथा संगीत कला अकॅडमी अकोला* चे संचालक श्री महादेव उर्फ नानाभाऊ सदनशिव हे दरवर्षी उत्कृष्ट तथा नियोजनबद्ध उपवधू परिचय मेळाव्याच्या नियोजन आणि आयोजन करत असतात त्याच पद्धतीने या वर्षात सुद्धा त्यांनी आपल्या समाज बांधवांकरिता हे आयोजन कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी केंद्र समोर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाजूला अकोला येथे केले असून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व विविध संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ता समाज बांधव यांनी आपापल्या परिसरातील तथा जिल्ह्यातील व शहरातील वधूवरांना अवगत करून या होणाऱ्या भव्य दिव्य राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय समारंभाला खालील दिलेल्या नोंदणीकृत नंबर वर नाव नोंदवून संपर्क करून उपस्थितीत दर्शवावी ही आयोजकांनी विनंती केली आहे
*वेदांतिका कला क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था तथा संगीत कला अकॅडमी अकोला*खाली दिलेल्या नाव नंबर वर आपल्या मुलामुलींची माहीती बायोडेटा झेरॉक्स 10 जानेवारी 2024 पर्यंत संस्थेपर्यंत पोहोचवा असे आव्हान करण्यात आले आहे