कौटुंबिक वाद विकोपाला; मुलाने केली वडिलांची हत्यालोणीगुरव येथील घटना : आरोपी मुलाला पोलिसांनी केली अटक
AB7
कौटुंबिक वाद विकोपाला; मुलाने केली वडिलांची हत्यालोणीगुरव येथील घटना : आरोपी मुलाला पोलिसांनी केली अटक
खामगाव : सततच्या कौटुंबिककलहाला कंटाळून लोणी गुरव येथील २५ वर्षीय मुलाने वडिलांचा लाकडी दांड्याने अमानुष मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवार, ३० एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख धोंडोपंत हिवराळे (वय ५५, रा. लोणीगुरख) असे मृताचे नाव असून, त्यांना दारूचे व्यसन होते. ते नेहमी मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन पत्नी व घरच्यांशी वाद घालत असत. सोमवार, दि. २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ते पुन्हा नशेत घरी परतले. त्यावेळी त्यांचा मुलगा धनंजय ऊर्फ शंकर गोरख हिवराळे (वय २५) याच्याशी जोरदार वाद झाला. वाद वाढत गेल्यावर संतप्त झालेल्या धनंजयने लाकडी दांड्याने वडिलांना जबर मारहाण केली.या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे गोरख हिवराळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अरुण धोंडोपंतगोरख हिवराळेमृतकधनंजय हिवराळेआरोपीहिवराळे (रा. बोथाकाजी, ता. खामगाव) यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलिस उपनिरीक्षक राची पुसाम करत आहेत.पोलिस घटनास्थळीघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपासाची माहिती घेतली. यावेळी ठाणेदार चव्हाण व तपास अधिकारी उपनिरीक्षक राची पुसाम यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपी धनंजय हिवराळे याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.