ताज्या घडामोडी

चाकूचा धाक दाखवून तीन लाख रुपयांचा ऐवज लुटला

Ani

चाकूचा धाक दाखवून तीन लाख रुपयांचा ऐवज लुटला

 

धामणगाव रेल्वे- चाकूचा धाक दाखवून स्टोन क्रशरच्या दिवानजीच्या जवळील तीन लाख रुपयांची रकम लुटली. दिवानजीची दुचाकी, दोन स्मार्ट मोबाईल घेवून धूम ठोकल्याची घटना रविवारला (ता.१) सकाळी 8 वाजताच्या सुमारास पडली. ही घटना रामगाव गावाजवळ घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान दत्तापुर पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद देण्यात आली आहे. स्थानिक पोलीस गुन्हे शाखेसह दत्तापुर पोलीस आरोपींच्या शोध घेत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार असे की, निलेश शेषराव चाफले (45) रा. श्री स्वामी समर्थ नगर, जुना धामणगाव ते साई स्टोन क्रेशर येथे दिवानजी म्हणून गेल्या पाच वषांपासून काम पाहत आहे. रविवारला (ता.१) सकाळी 7.45 वाजता साई स्टोन क्रेशर येथे मजुराचा पगार असल्याने हे घरुन रामगाव रोडने दुचाकी क्र.एम.एच.27- एझेड 8030 ने

 

हिरव्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये 2 लाख 88 हजार रुपये, हिशोबाचे चार रजिस्टर असलेली बॅग घेवून साई स्टोन क्रेशर रामगाव येथे निघालो असता अंदाजे 8 वाजताच्या सुमारास रामगाव रस्त्याने जात असता बाळासाहेब तुपसुंदरे यांचे शेताजवळ एका पेंशन प्रो काळ्या रंगाचे मोटर सायकलवर दोन ईसम मागे येवुन त्यांची मोटर सायकल निलेश चाफले गाडीचे समोर आडवी लावली. त्या मोटर सायकलवर असलेल्या दोन इसमापैकी एका

 

इसमांनी त्यांचे मोटर सायकलवरून उतरुन मला चाकूचा धाक दाखवुन हिरव्या रंगाच्या कापडी पिशवी मधील 2 लाख 88 हजार रुपये, हिशोबाचे चार रजिस्टर असलेली बंग जबरीने हिसकावुन घेवून मला ढकलुन दिले. त्यामुळे निलेश चाफले खाली पडले व त्यांनी आरडाओरडा केली असता तेथील बाजुच्या शेतात काम करीत असलेला राहुल गौतम बन्सोड रा. रामगाव हे धावत

 

आला तेव्हा त्या दोघांनी त्यांची दुचाकी व निलेश याफले यांची दुचाकी घेवून पळून गेले. त्या नंतर निलेश चाफले यांनी राहुल गौतम बन्सोड यांच्या दुचाकीने त्या दोघांचे पाठीमागे गेले असता तर निलेश चाफले यांची दुचाकी तेथुन थोड्या अंतरावर रामगाव ते धामणगाव रोडवर स्मशान भुमी जवळ मोटरसायकल टाकून दिलेली दिसली. व ते दोन्ही इसम त्यांचे मोटर सायकलवर बसुन धामणगाव रेल्वे कडे पळून गेले. 2 लाख 88 हजार रोख रकम, 14 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकंदरीत 3 लाख 2 दोन हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून गेला. या घटनेची फिर्याद दत्तापुर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून त्या दोन अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. अधिक तपास ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस करीत आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.