होळी सणानिमीत्य अवैद्यरीत्या विनापास परवाना देशी दारुची वाहतुक करुन देशी दारुची साठवणुक करणारे पोलीसांच्या जाळ्यात
AB7
होळी सणानिमीत्य अवैद्यरीत्या विनापास परवाना देशी दारुची वाहतुक करुन देशी दारुची साठवणुक करणारे पोलीसांच्या जाळ्यात
पुलगांव ( चिंटू दुबे):-होळी सणासाठी होत असलेली दारू तस्करी नाकेबंदी करून मोठ्या शिताफीने पुलगांव पोलीसांगी हातून काढली. सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री.राहुल सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अमंलदार पो.हवा. रितेश गुजर ब.क्र. 297 पोलीस स्टेशन पुलगाव यांना मुखबीर कडुन खात्रीशीर खबर मिळाल्यावरुन नाकेबंदी करुन व देशी दारुची साठवणुक करणारे आरोपी नामे 1) संजय जयकुमार मुन वय 37 वर्ष रा. कवठा (रेल्वे) ता. देवळी जि. वर्धा 2) 2) हिरामन सिताराम लोहकरे वय 72 वर्ष
रा. वार्ड क्र.01 कवठा (झोपडी) ता. देवळी जि. वर्धा प्रो. रेड केला असता यातील आरोपी क्रमाक 01 यांन अवैधरित्या विनापास परवाना देशी दारुची वाहतुक करुन आरोपी क्रमाक 02 याचे घरी देशी दारुची साठवणुक करीत
असताना मिळून आल्याने त्याचे कडून 1) सात खाकी खोक्यात प्रती खोका 48 शिशा प्रमाणे 336 सिलबंद देशी दारुच्या शिशांवर बंच नंबर Lx/682 FE 25, Ly/692 FEक्क 25 असे असलेले प्रती नग 100/-रु. प्रमाणे 33,600/-रु.
2) एक जुनी वापरती जाभळ्या रंगाची TVS कंपनीची ज्युपीटर मोपेड क्रमाक MH-32-AV-3728 अंदाजे किमंत 80,000/- रु. 3) एक जुना वापरता पिंक रंगाचा रेडमी कंपनीचा अंडरॉईड मोवाईल अंदाजे किमंत 8,000 रु.
असा एकुण जुमला किमंत 121,600/- रु. चा माल मुद्देमाल पंचासमक्ष जस करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. अनुराग जैन पोलीस अधिक्षक सा. वर्धा, मा. डॉ. सागर कवाडे अपर पोलीस अधिक्षक, मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगाव श्री. राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात श्री. राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोउपनि घनश्याम जाधव, रितेश गुजर, अनुप खेडकर, ओमप्रकाश तामारी, विश्वजीत वानखेडे व होमगार्ड सैनिक शेख शोयब अखिल खान यांनी केली आहे.