ताज्या घडामोडीराजकीय

‘पोलीस अधीक्षक, ठाणेदारांची यादी तयार गृहखातं येताच…’; पटोलेंचा लातूरमधून थेट इशारा

नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते लातूरमध्ये बोलत होते.

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान त्यापूर्वी प्रचाराचा धुराळा उडाला असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज लातूरमध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.

नानो पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदींसमोर त्यांच्या खासदारांना बोलण्याची मुभा नाही. त्यांना संविधान मान्य नाही. भाजप हा शिकारी आहे, एखाद्या पक्षाला पकडून खावू पिवू घालतात, त्याला बघून इतर पक्षी आले की ते त्याची शिकार करतता. भाजपमध्ये दोनच लोक पक्ष चालवतात, त्यांच्या खासरांना महत्त्व राहिलेलं नाही, लातूरमध्ये पुन्हा भाजप उभीच राहिली नाही पाहिजे असं पटोले यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांवर कसा अन्याय करतो, हे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांना सागू द्या. भारत जलाव पार्टी म्हणजे भाजपा.  छगन भुजबळ आमच्या सोबत होते, विधानभवनात एकदा भुजबळ म्हणाले होते, भारत जलावं पार्टी आता तेही तिकडे गेले. शेती मालाचे भाव वाढत नाहीत, सोयाबीनचे ही भाव वाढत नाहीत. नांदेडचा एक स्वयभू नेता आहे, तो काँग्रेसच्या जीवावर दोनदा मुख्यमंत्री झाला. त्याने सरकार कडून 150 कोटी रुपये साखर कारखाना तोट्यात असल्याचं दाखवून घेतले, असं म्हणत यावेळी अशोक चव्हाण यांना देखील पटोले यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

आमचं सरकार आल्यावर कंत्राटी नोकर भरती केली जाणार नाही, थेट एमपीएससीच्या माध्यमातून पर्मनंट नोकरी मिळणार.  आपल्या राज्यात पैशांची कमी नाही. मात्र यांनी देशात महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्याबाबत नंबर एकवर आणला. पोलीस अधीक्षक, ठाणेदार यांची यादी तयार केली आहे. आमच्याकडे गृह खाते आल्यानंतर असं चिक्की पिसिंग म्हणणाऱ्यांना आम्ही आत टाकणार, असा इशाराही यावेळी पटोले यांनी दिला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.