महाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादीतील फुटीला कोण जबाबदार? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्या पुण्यात बोलत होत्या.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात परिवर्तन येईल का नाही, तर परिवर्तन आणावंच लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार यांनी काही आमदारांंना सोबत घेऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं. यावर आता पुन्हा एकदा प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात परिवर्तन येईल का नाही, तर परिवर्तन आणावंच लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. घरात मतभेद होण्यामागे कोण आहे? तर यामागे दिल्लीची अदृश्य शक्ती आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्या घरातील महिलांना पण या प्रकरणात ओढण्यात आलं. कारण नसताना माझ्या बहिणीविरोधात रेड टाकण्यात आली.  आज आम्ही संविधान हातात घेतलं तरी दडपशाही केली जाते. कितीही दडपशाही केली तरी आम्ही संविधानाचा आवाज बुलंद करू, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप हा शिकारी पक्ष आहे, तो आधी एखाद्या पक्षाला पकडून चांगलं खावू  पिवू घालतो. ते पाहून इतर पक्ष जवळ आले की त्यांना संपून टाकतो असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर बोलण्याची मुभा त्यांच्या खासदारांना नाही. भाजपमध्ये दोनच लोक पक्ष चालवतात.  भाजप कार्यकर्त्यांवर कसा अन्याय करतो, हे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांना सांगू द्या. भारत जलाव पार्टी म्हणजे भाजपा, असा हल्लाबोलही यावेळी नाना पटोले यांनी केला आहे. ते लातूरमध्ये बोलत होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.