ताज्या घडामोडी

गरजूंना लाभ मिळण्यासाठी अधिकाधिक रूग्णालयांचा जनआरोग्य योजनेत समावेश करा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

AB7News

गरजूंना लाभ मिळण्यासाठी अधिकाधिक रूग्णालयांचा जनआरोग्य योजनेत समावेश करा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला : गरीब व गरजू रूग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून ३० व ३० हून अधिक खाटा असलेली जास्तीत जास्त खासगी रूग्णालये अंगीकृत करावीत. एकही गरजू रूग्ण लाभापासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.आयु्ष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा आढावा जिल्हाधिका-यांच्या दालनात घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, योजनेच्या जिल्हा समन्वयक शीतल गावंडे, डॉ. नागेंद्र वाघ, डॉ. आनंद चाकोते, श्याम फाले, कुंदन गावंडे, अनंत पागृत व खासगी रूग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ अधिक लोकांना मिळण्यासाठी खासगी रूग्णालयांना प्रेरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार एकही गरजू रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी अधिकाधिक खासगी रूग्णालयांचा समावेश व्हावा.

रूग्णालयांनीही आपल्याकडील सुविधांची माहिती सादर करून योजनेत अंगीकृत व्हावे. रूग्णालयांच्या काही अडचणी असतील तर राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मार्गदर्शन घेऊन त्या निश्चित सोडविण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिका-यांनी दिली. योजनेत पाच लाख रू. पर्यंतचे आजारांवर विनामूल्य उपचार केले जातात. सध्या जिल्ह्यात ३१ रूग्णालये योजनेत अंगीकृत आहेत. तथापि, जिल्ह्यातील तालुके व लोकसंख्या पाहता जास्तीत जास्त खासगी रूग्णालये योजनेत सहभागी करावीत जेणेकरून गरीब व गरजू नागरिक वंचित राहणार नाहीत, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले. श्रीमती गावंडे यांनी योजनेत अंगीकृत होण्यासाठी अर्जप्रक्रियेबाबत खासगी रूग्णालयांच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.