महिला उमेदवाराचे अपघाती निधन, अकोट प्रभाग ४ ब मधील निवडणूक रद्दचे संकेत
अकोला: निवडणूक रिंगणातील उमेदवार महिलेचे शनिवारी मार्ग अपघातात निधनझाल्याने अकोट नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ व मधील निवडणूक रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. अकोटच्या निवडणूक अधिका-यांनी यासंदर्भातील अहवाल राज्याच्या निवडणूक आयोगाकडे पाठविला असून आयोगाच्या निर्देशानंतर यासंदर्भात अधिकृत रद्दची घोषणा होऊ शकते, अकोला जिल्हातील ५ नगर परिषद आणि १ नगर पंचायतच्या निवडणुका आगामी २ डिसेंबर २५ रोजी होत असताना अकोट नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ व मधील राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचे २९ नोव्हेंबर २५ रोजी निधन झाले. त्यामुळे येथील प्रभागातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागले आहेत. उमेदवार महिलेच्या अपघाती निधनानंतर नेमके काय करावेत, यासंदर्भाची माहिती तातडीने अकोटच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली. या परिस्थितीत आयोगाच्या सूचना काय असू शकतात? याबाबत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, या प्रभागातील निवडणूक प्रक्रीया रद्द करून पुन्हा येथे सुरुवातीपासून संपूर्ण प्रक्रीया घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र अजूनतरी यासंदर्भात अधिकृत निर्देश जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेले नाहीत.
