आपला जिल्हा

१२४ बूथ पोलिसांच्या नजरेत संवेदनशील !एसपी अर्चित चांडक : निर्भीड निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

AB7

१२४ बूथ पोलिसांच्या नजरेत संवेदनशील !एसपी अर्चित चांडक : निर्भीड निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

अकोला, – आगामी निवडणुकीत जिल्ह्यात १२४ बूथ पोलिसांच्या नजरेत संवेदनशील असून त्यावर करडी नजर ठेवलेली असल्याची माहिती अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली. अकोला जिल्ह्यात दि.२ डिसेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा पोलिस यंत्रणा सर्वदृष्ट्या सज्ज असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी संवाद बोलले.राज्यासह अकोला जिल्हयात सुमारे ९ वर्षानी अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, हिवरखेड नगर परिषदेच्या आणि बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. नगराध्यक्ष व प्रभागांसाठी होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी निवडणूक क्षेत्रात जोरदार प्रचार सुरू आहे. यादरम्यान कुठे आचार संहितेचा भंग झालाका? अशी विचारणा पत्रकारांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना केली असता, एकही नाही असे उत्तर त्यांनी दिले. मूर्तिजापूर येथे केवळ अडीच लाख रूपयांची जप्तीची माहिती त्यांनी येथे दिली.जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यासह संयुक्तरित्या सर्व ईमारती आणि बुथची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. होणाऱ्या निवडणुकांमध्ये पोलिसांच्या दृष्टीने १२४ बूथ संवेदनशील आहेत. निवडणूक आयोगाच्या दृष्टीने ते संवेदनशील नसले तरी गुन्हेगारी आणि संमीश्र लोकवस्ती असल्याचे निकष काढून आम्ही त्यावर विशेष लक्ष केंद्रीत केलेले आहे. अशी माहितीही त्यांनी संवाद साधताना दिली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षकांसह ७वरीष्ठ अधिकारी, ११६ पोलिस निरीक्षकस्तराचे अधिकारी, २३०० पोलिस कर्मचारी, ६०० होमगार्ड, आणि एक एसआरपीकंपनी बंदोबस्तात आहे. अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, हिवरखेड नगर परिषदेच्या आणि बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी १०० ईमारतीमध्ये २४७ बूथ आहेत. सहा नगराध्यक्षपदासाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर १४२ सदस्यांसाठी ६८० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.