AB7
मातृशक्ती भाजपाच्या पाठीशी ठाम; स्थानिक स्वराज्य निवडणुकांत भाजपाचा विजय निश्चित – सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रेमहिला आघाडीचा व्यापक जनसंपर्क अभियान; बाळापूर, हिवरखेड, तेल्हारा, मुर्तीजापूर, अकोट, बार्शी टाकळीमध्ये उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद
अकोला : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात सर्वस्पर्शी विकास घडवण्याची क्षमता असून समाजहित, राष्ट्रहित आणि परिवारहिताच्या मूल्यांशी बांधीलकी जपणाऱ्या मातृशक्तीने भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाळापूर, हिवरखेड, तेल्हारा, मुर्तीजापूर, अकोट आणि बार्शी टाकळी येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदांचे भाजपाचे उमेदवार मोठ्या ताकदीने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.सुवासिनीताई धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपा महिला आघाडीने विविध नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात व्यापक जनसंपर्क करून मतदारांचे समर्थन मिळवले. मातृशक्ती भाजपाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लाडकी बहिण’पासून मोफत शिक्षणापर्यंत आणि सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या अनेक कल्याणकारी योजनांमुळे जनतेत सकारात्मकता निर्माण झाली आहे, असेही त्या म्हणाल्या.राज्यातील रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवेची उभारणी ही युती सरकारची मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध आजारांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या पाच लाख रुपयांच्या मदत योजनेचा लाभ हजारो रुग्णांनी घेतल्याचे त्या म्हणाल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या विशेष योजनांमुळे समाजातील सर्व स्तरांतून भाजपाला पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.सौभाग्यवती नूतन हरीश पिंपळे यांनीही भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ अनेक ठिकाणी जनसंपर्क साधलाया प्रचार मोहिमेत सुमनताई गावंडे, समीक्षा ताई धोत्रे, मोनिकाताई गावंडे, चंदाताई शर्मा, वैशालीताई शेळके, अॅड. रूपालीताई काकडे, गीतांजलीताई शेगोकार, पुष्पाताई रत्नपारखी, जयश्रीताई पुंडकर, जयश्रीताई जाधव, ऋचा शाह, सुलभाताई सोळंके, कुसुमताई भगत, अर्चना जाधव, ज्योती टाले, अर्चना मसने, अर्चना शर्मा, सुनिता अग्रवाल, सीमा मागटे, मोनिकाताई वाघ, चंदा शर्मा, चंदा ठाकूर आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता. अकोला जिल्हा ग्रामीणमधून शारदा ढोरे, सारिका जयस्वाल, मनीषा भन्साली, आरती धोगोलिया व अन्य कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.