ताज्या घडामोडी

प्रशासकीय अधिकाऱ्यांची गाडी थांबली. आणि जिल्हा सवीपचार रूग्णालया समोरची चौपाटी अचानक स्वच्छ झाली.

AB7

सर्वोपचार समोरील चौपाटी परिसर मोकळा झाला

 

अकोला : जिल्हा रुग्णालय समोरील चौपाटीपरिसर बुधवारी सायंकाळी मोकळा झाला. अकोलेकरांनी आश्चर्य व्यक्त केले. रोज अकोलेकरांना त्रास सहन करावा लागला होता. परंतु अचानक ही चौपाटी साफ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची गाडी थांबली. आणि जिल्हा सवीपचार रूग्णालया समोरची चौपाटी अचानक स्वच्छ झाली. रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रोजच रस्त्यावर होणारी गर्दी, कचरा आणि अनागोंदीचा सामना करणाऱ्या अकोलेकरांना वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची गाडी या मागीवर थांबल्याने महापालिका व पोलिस प्रशासनाने हीचौपाटी साफ करून टाकली. सामान्य जनतेला रोज या चौपाटीचा त्रास असून थेट रस्त्यावरची पार्किंग ही मुख्य समस्या या चौपाटीची आहे. त्यामुळे अनेक अपघात येथे झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुख्य शासकीय कार्यालय आणि परिसरातील इतर नागरिकांना या चौपाटीचा रोजचा त्रास झाला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची गाडी बेशिस्त पार्किंगमुळे थांबली.त्यानंतर पोलिस व महापालिका प्रशासनाने अखेर सायंकाळी या चौपाटीवरील सगळ्या खाद्यविक्रेतांना हटविले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे या चौपाटीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असून वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथील खाद्य विक्रेत्यांच्या परवान्याची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.