मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राज्यात पुढील ५ दिवस अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता !
AB7
मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राज्यात पुढील ५ दिवस अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता !
पुणे : राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणाचीही निर्मिती झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील ४ दिवसात पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविल विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. हिंगोली जिल्ह्यात पुढील ४ दिवस काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर नांदेड जिल्ह्यात ५ दिवस पावसाला पोषक हवामान आहे. रविवारी आणि सोमवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारी काही भागात पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात उद्या पावसाचा अंदाज देण्यात आला.