ऑटो चालकानी ऑटो चालवितांना गनवेश परीधान करावा – पोलीस अधीक्षक
अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांचे संकल्पनेतुन व त्यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला तर्फे सर्व ऑटो चालक, ऑटो रिक्षा संघटना आणि प्रवाश्यांच्या माहितीसाठी कळविण्यात येते की, ऑटो चालक व ईतर प्रवासी वाहन चालक यांनी आपले प्रवासी वाहन चालवितांना गणवेश परिधान करावे. शहरातील सार्वजनीक वाहतुकीस शिस्तबध्द व सुरक्षित बनविण्याच्या उद्देशाने सर्व ऑटो चालकांनी सेवा देतांना अधिकृत गणवेश परिधान करणे बंधनकारक असुन मोटार वाहन कायदा कलम २० (१) (Viii) / १७७ प्रमाणे आवश्यक आहे. गणवेश परिधान केल्याने प्रवाशांना विश्वासार्हता मिळते तसेच शिस्त आणि स्वच्छतेला प्रोत्साहन मिळते. सर्व ऑटोचालकांनी व प्रवासी वाहतुक करणारे वाहन चालकांनी याबाबत सहकार्य करावे अन्यथा दिनांक १४/०४/२०२५ रोजी पासुन संपुर्ण अकोला जिल्हयात प्रवासी वाहन चालविणारे चलकांनी गणवेश परिधान न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे तरी सर्व ऑटो चालक व इतर प्रवासी वाहन चालक यांनी याबाबत दक्षता घ्यावी. ऑटो चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे व सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन मा. श्री. बच्चन सिंग साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोल जिल्हयातील नागरीकांना केले आहे.