अकोला जिल्हातील एका गावातील बाल विवाह थाम्बविण्यास ॲसेस टु जस्टीस प्रकल्प यांना यश
अकोला : गावात अल्पवयीन मुलीचा बाल विवाह ठरवून विवाह करणार असल्याची गोपनीय माहीती प्राप्त होताच ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस टीम ने बालिकेच्या घरी भेट दिली असता मुलीच्या आजी कडून माहिती मिळाली की, मुलीचे वडील 4 वर्षांपूर्वी मरण पावले असून आई ने दुसरे लग्न केले तेव्हा पासून मुलीचे पालणपोषण आजी करत होती. परंतु घरची आर्थिक स्तिथी हलाक्याची असल्याने तसेच आजी ला पण कोणाचा आधार नसल्याने मुलीचे लग्न करण्याचा विचार केला होता. भेटी दरम्यान आजीने सांगितले. तेव्हा आजी यांची समजूत काढली व बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहीती दिली. मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न करता येत नाही असे सांगितले व मुलीला बाल कल्याण समिती अकोला यांचे समक्ष सादर करण्यात आले. बालकल्याण समितीने मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न न करण्याबाबतचे हमी पत्र लिहून घेतले त्यावेळी ग्रामविकास अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील, पोलीस यांची साक्ष घेण्यात आली. सदर बालविवाह थाम्बविन्यासाठी मार्गदर्शन बाल कल्याण समिती अकोला, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे लाभले, तसेच ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपना गजभिये, विशाल गजभिये कम्युनिटी सोशल वर्कर पूजा पवार, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील यांनी मोलाचे कार्य केले.