स्थानिक नागरिकही भरडले जाणार?तहसील कार्यालयाने जन्म दाखले रद्द करण्यासाठी पत्र दिले आहे.
AB7
‘ जन्म दाखले आणि विवाह प्रमाणपत्रे मनपा रद्द करणार!
अकोला : महापालिकेत जन्माची नोंद नसलेल्या नागरिकांना तहसीलदारांचे संमतीपत्र आवश्यक असायचे. त्या आधारे तहसील कार्यालयाने संमतीपत्र दिले, त्यावर हजारो नागरिकांनी महापालिकेकडून जन्म दाखले मिळविले. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे काही बांग्लादेशी नागरिकांनी भारतीय जन्म दाखले मिळविल्याचे पुरावे सादर केले. या पार्श्वभूमीवरजिल्ह्यात ५२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाने महापालिकेला पत्र पाठवून जन्म दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितले आहे.तहसील कार्यालयाच्या पत्रानुसार महापालिकेला संशयास्पद वाटत असलेल्या जन्म दाखले, विवाह दाखल्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने गत वर्षभरामध्ये दिलेले जवळपास २८०० जन्म दाखले रद्द करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या प्रकरणाच्या चौकशीत प्रशासनाला आढळले की, तहसील कार्यालयाने दिलेल्या संमतीपत्रांच्या आधारे अनेक जणांनी जन्म दाखले घेतले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाने महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाला पत्र पाठवून अशा सर्व दाखल्यांचे पुनर्परीक्षण करून रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक नागरिकांचे जन्म व विवाह दाखले रद्द होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कायदेशीर उपाय शोधण्याचा सल्ला घेतला जात आहे.स्थानिक नागरिकही भरडले जाणार?तहसील कार्यालयाने जन्म दाखले रह करण्यासाठी पत्र दिले आहे. महापालिकेत जन्माची नोंद नसलेल्या तहसील कार्यालयाच्या संमती आदेशानुसार महापालिकेच्या जन्म-विभागातून जन्माचे दाखले देण्यात अ त्यामध्ये नागरिक, युवक, विद्यार्थी, महिलासुद्धा आहेत. बांग्लादेर्शीच्या बोगस प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांमुळे स्थानिकांचे जन्म दाखले रद्द होणार आहे.