अकोला शहरात 13 किलो अमली पदार्थाचा साठा हस्तगत !
अकोला : रामदासपेठपोलिस स्टेशन हद्दीतील मुसा कॉलनी, मोहता मिल रोड येथे पोलिसांनी एका इसमाकडून १२ किलो ८० ग्रॅम अमली पदार्थ गांजा हस्तगत केला. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनासह एकूण १४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुसा कॉलनी, मोहता मिल रोड येथे एक इसम अमली पदार्थ गांजा विक्री करीत आहे. त्याने अमली पदार्थ गांजा विक्रीकरिता त्याच्या घरालगत असलेल्या खुल्या पॉटमध्ये त्याच्या मालकीच्या पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीच्या चारचाकी वाहनामध्ये अमली पदार्थ गांजा साठवूनठेवला आहे. या माहितीवरून त्या ठिकाणी छापेमार कारवाई करून आरोपी राजीक खान लतीफ खान (२६) रा. मुसा कॉलनी, मुसा मशीदजवळ याच्या घरालगत असलेल्या खुल्या पॉटमध्ये त्याच्या मालकीचे चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३० जे.जे. ३१३२ मध्ये डिक्कीतून एकूण १२ किलो ८० ग्रॅम गांजा किंमत २ लाख ४० हजार रुपये वएक चारचाकी 13किलो अमली …वाहन असा एकूण १४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रामदासपेठ पोलिस स्टेशन येथे आरोपीविरूध्द एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद केला आहे.यांनी केली कामगिरी !सदर कारवाई एसपी बच्चन सिंह, एएसपी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय शंकर शेळके, एपीआय विजय चव्हाण, पीएसआय माजीद पठाण, पो. अं. राजपालसिंह ठाकूर, गणेश पांडे, रवींद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, वसिमोद्दीन, मोहम्मद एजाज, अशोक सोनवणे, भीमराव दिपके, अक्षय बोवडे यांनी केली.