युवा प्रशिक्षणार्थीचे आझाद मैदानावर धरणे आंदोलनआमदार साजिदखान पठाण यांनी आंदोलनस्थळी भेट
अकोला : राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत असलेल्या प्रशिक्षणार्थीचे विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत थरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिदखान पठाण यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्या प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत असलेल्या प्रशिक्षणार्थी यांचे विविध मागण्यांसाठी ३ मार्चपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. सदर आमरण उपोषणाला सोमवारी पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आ. साजिद खान यांनी दिली भेट
युवा प्रशिक्षणार्थीयांत!ण उपोषणास पाठिंबाउर्थ्यांचेआंदोलआमदार साजिदखान पठाण यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करताना आ. पठाण म्हणाले की, याविषयी यापूर्वी अकोला जिल्ह्यातीलसुद्धा अनेक प्रशिक्षणार्थी यांनी आपल्याशी चर्चा केली आहे, आपण या सर्व विषयांना समजून घेत हा विषय सरकारसमोरमांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रशिक्षणार्थी असलेल्या आपल्या सर्वांच्या मागण्या या रास्त असून, सरकारने मान्य करायला हव्या, अशी भूमिकासुद्धा यावेळी आ. पठाण यांनी व्यक्त करीत मी तुमच्या लढ्यात सोबत आहे असे आश्वासन दिले.