लहुजी शक्ती सेना च्या शहर महिला अध्यक्षपदी सौ. सारिका स्वर्गे यांची नियुक्ती
अकोला:-शासकीय विश्रामगृह येथे लहुजी शक्ती सेना जिल्हा बैठकीतअकोट शहर महिला अध्यक्षपदी सौ. सारिका स्वर्गे यांची नियुक्ती करण्यात आली.
मातंग समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विकास साधण्याकरिता महाराष्ट्रभर लहुजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता जोमाने कामाला लागले आहे त्या अनुषंगाने आकोट शहरातील मातंग समाजातील जागृत महिला कार्यकर्ता यांना समाजकार्याची आवड आहे. अशा सौ. सारिका ताई स्वर्गे यांची अकोट शहर महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती प्रदेश महासचिव श्री वामनराव भिसे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी पश्चिम विदर्भ महासचिव श्री प्रकाश भाऊ दांडगे,अकोला जिल्हा युवक आघाडी प्रभारी श्री पिंटू भाऊ अंजनकर,अकोला शहर उपाध्यक्ष श्री गजानन गवई यांच्यासह कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.